पाहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ


पाहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ यांच्या आयुष्यातील काही घटना 

  1. बाळाजी पेशवे झाल्यावर लगेच कान्होजी आंग्र्यांच्या मोहिमेवर गेले. कान्होजी आंग्रे आरमार प्रमुख होते त्यांनी कोकणात आपला दबदबा निर्माण केला होता. कान्होजीं सारखा सेनानी जर शाहू महाराज्यांना येऊन मिळाला तर मराठी राज्याची ताकद प्रचंड वाढेल या हेतूने बाळाजी विश्वनाथांनी कान्होजींकडे दूत पाठवला व शाहू महाराज्यांच्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न केला. कान्होजींना देखील ते पटले व त्यांनी आनंदाने स्वीकार केला शाहूमहाराज्यांच्या पक्षात गेल्यावर कान्होजीना २६ किल्ले व अंदाजे २४ लक्ष होन एवढा मुलुख मिळाला. कान्होजी आणि बाळाजी पेशवे यांच्या एकत्रित बळापुढे सिद्दी याकूतखान याचा निभाव लागला नाही. शेवटी सिद्दीने सातारा दरबारशी तह केला. बाळाजींनी अत्यंत हुशारीने आरमार सातारा राज्यास जोडले. हि इतर परकीय सत्तांसाठी डोकेदुखी ठरली. शाहू महाराजांचा बाळाजींवरचा विश्वास वाढला.
  2. बहादूरशहाच्या मृत्यूनंतर त्याचा मोठा मुलगा जहांदरशहा आपल्या भावांना मारून गादीवर बसला. पण यात त्याचा पुतण्या फर्रूखसियर हा वाचला कारण तो त्यावेळी बंगाल मध्ये होता. बापाच्या वधाचा बदल घेण्यासाठी फर्रूखसियर दिल्लीस निघाला त्याच्याबरोबर हसनअली  सय्यद व हुसेनअली  हे सय्यदबंधू  होते. सय्यद बंधूनी जहांदरशा ला लढाईत पकडले. जहांदरशहा व फर्रूखसियर यांच्या लढाईत फर्रूखसियर याचा विजय झाला. यामुळे सय्यद बंधूचे वजन वाढले. फर्रूखसियर दिल्लीचा बादशहा झाला. त्याने हसनअली यास वजीर केले व हुसेनअली यास दख्खन चा सुभेदार नेमले. यादरम्यान हुसेनअली व शाहू महाराज यांच्यात तह घडून आला यानुसार स्वराज्यातील मुलुख जो मोगलांकडे होता तो [कर्नाटक ,खान्देश ] शाहूमहाराज्यांना परत मिळाला. सय्यद बंधू हे शिया पंथीय होते त्यांच्या विरोधात दिल्लीत राजकारण चालले. याचा परिणाम असा कि बादशहा फर्रूखसियर याने सय्यद बंधुना मारायचे असे ठरवले व सैन्य जमवायला सुरुवात केली. वजीर हसन अली यास याची कुणकुण लागली व त्याने हुसेन अली यास सैन्यासह दिल्लीत बोलावले . हुसेन अली दिल्लीस निघाला त्याच्याकडे पन्नास हजार फौज व मदतीस बाळाजी विश्वनाथ व पन्नास हजार मराठा फौज अश्या एक लाख फौजेने दिल्लीकडे कूच केले. एवढी फौज बघून व युद्धाची तयारी झाली नसल्याने फर्रूखसियर याने सय्यद बंधूबरोबर तह केला व संभाजी महाराज्यांचा दासीपुत्र मदनसिंह यास मुक्त केले . परंतु फर्रूखसियर आज ना उद्या आपल्यावर उलटणार हे सय्यद बंधूंना पटले व फर्रूखसियरने शाहू महाराज्यांच्या मातोश्री व इतर परिवारास सोडण्यास नकार दिला शेवटी सय्यद बंधूनी लाल किल्ल्यात सैन्य घुसवले व फर्रूखसियर ला  कैद केले. यात पेशव्यांना तहनाम्यावर बादशाही सनदा मिळाला व राजमाता येसूबाई यांना मुक्त करण्यात आले. यानांतर तब्बल बारा वर्षांनी शाहूमहाराज व येसूबाई यांची भेट झाली आपल्या आईची सुटका बाळाजी पेशवे यांच्यामुळे झाल्याने शाहूमहाराजांचा बालाजी पेश्वव्यांवरचा विश्वास कैक पटीने वाढला.







Comments