पाहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ
पाहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ यांच्या आयुष्यातील काही घटना बाळाजी पेशवे झाल्यावर लगेच कान्होजी आंग्र्यांच्या मोहिमेवर गेले. कान्होजी आंग्रे आरमार प्रमुख होते त्यांनी कोकणात आपला दबदबा निर्माण केला होता. कान्होजीं सारखा सेनानी जर शाहू महाराज्यांना येऊन मिळाला तर मराठी राज्याची ताकद प्रचंड वाढेल या हेतूने बाळाजी विश्वनाथांनी कान्होजींकडे दूत पाठवला व शाहू महाराज्यांच्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न केला. कान्होजींना देखील ते पटले व त्यांनी आनंदाने स्वीकार केला शाहूमहाराज्यांच्या पक्षात गेल्यावर कान्होजीना २६ किल्ले व अंदाजे २४ लक्ष होन एवढा मुलुख मिळाला. कान्होजी आणि बाळाजी पेशवे यांच्या एकत्रित बळापुढे सिद्दी याकूतखान याचा निभाव लागला नाही. शेवटी सिद्दीने सातारा दरबारशी तह केला. बाळाजींनी अत्यंत हुशारीने आरमार सातारा राज्यास जोडले. हि इतर परकीय सत्तांसाठी डोकेदुखी ठरली. शाहू महाराजांचा बाळाजींवरचा विश्वास वाढला. बहादूरशहाच्या मृत्यूनंतर त्याचा मोठा मुलगा जहांदरशहा आपल्या भावांना मारून गादीवर बसला. पण यात त्याचा पुतण्या फर्रूखसियर हा वाचला कारण तो त्यावेळी बंगाल मध्ये होता....